लोकापवादाला सामान्य जनतेमधे पसरण्याचा अवसर मिळू नये यासाठी अयोध्येच्या महाराणीला वनामधे पाठवल्यावर अयोध्येमधे रामराज्य सुरू झाले. राज्यात सर्वत्र सुख, शांती, सुबत्ता नांदू लागली. राज्यात सर्व धार्मिक कार्ये नियमितपणे होत होती. तपस्वी जनांचा आदर ठेवला जात होता. सर्व ऋतू समयानुसार आपापले कार्य करत होते. धरती धन धान्याने भरली होती. रामराज्य ह्या शब्दाची व्याख्या तयार झाली. अर्थ तयार झाला. अयोध्येतली प्रसन्नता तो अर्थ चारी दिशांना पसरवत होती. अर्थात ह्या प्रसन्नतेला एक अपवाद अवश्य होता. अयोध्येचा राजप्रासाद.
राजप्रासादात तिन्ही राजमाता अप्रसन्न होत्या. रघूवंशाचा वेल वाढत रहावा यासाठी त्यांनी अनेक व्रत-वैकल्ये केली होती. अनेक प्रकारची तपस्या केली होती. तेंव्हा कुठे पुत्र प्राप्तीचा आनंद त्यांना मिळाला होता. त्याच रघू वंशाचा अंश उदरात असताना त्यांच्या पुत्र वधूला राजप्रासाद सोडावा लागला होता. प्रासादात रहाणारे राजाचे तिन्ही बंधू अप्रसन्न होते. महाराणी त्यांच्यासाठी आदरणीय होती. तिच्या शिवाय या प्रासादात आपला ज्येष्ठ बंधू कसा रहात असेल? या विचाराने ते दुःखी होते. प्रासादात रहाणाऱ्या तिघा बंधुंच्या स्त्रिया अस्वस्थ होत्या. पती समोर प्रसन्न मुखाने वावरावे अथवा ज्येष्ठ भगिनीच्या भाग्यावर अश्रू ढाळावे हे त्यांना समजत नव्हते. त्या राजप्रासादाचा स्वामी? त्याला स्वतःचे आयुष्य होते का? प्रजेचे चारित्र्य त्याच्यासाठी महत्वपूर्ण होते. त्यासाठी स्वतःच्या वागण्याने मर्यादांचा मापदंड त्याने त्यांच्या समोर ठेवला होता. ह्या मर्यादा त्याच्यासाठी प्रसन्नता अप्रसन्नतेच्या पलीकडच्या होत्या. दिवस उलटत होते. वर्षे उलटली. प्रजापालनात तत्पर असलेल्या राजाच्या मनात आजकाल एक चिंता वावरत होती. ही चिंता वनात रहाणाऱ्या अयोध्येच्या महाराणी विषयी नव्हती. तिने जन्म दिलेल्या पुत्र अथवा कन्येविषयी नव्हती. लंकेचा बलाढ्य राजा तिच्या इच्छेविरुद्ध जावू शकला नव्हता, तिच्यापुढे काळ सुद्धा हात जोडून उभा राहील हे त्याला माहीत होते. त्याला चिंता होती, महान युद्धात त्याच्या हातून घडलेल्या ब्रह्महत्त्येची. राज्यसभेत अथवा इतरत्र होणाऱ्या ऋषी-मुनींच्या चर्चेत त्याने हा विषय काढला. ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावे अशी विचारणा केली. अनेक प्रकारच्या उपायातून अश्वमेध यज्ञ करणे हा सर्व संमत उपाय निघाला.
यज्ञाची तयारी सुरू झाली. राजाचे तिघे बंधू आणि सर्व मंत्रीगण कामाला लागले. यज्ञासाठी पवित्र जागा निवडली गेली. अन्न धान्य इतर सामग्री गोळा होवू लागली. यज्ञाची वार्ता ऐकून प्रजा प्रसन्न झाली. अनेक प्रकारचा दानधर्म, रोज चालणारे अन्नछत्र, विविध कलाकारांना मिळणारे उपहार ह्या स्वप्नात प्रजाजन रंगले. यज्ञामधे निर्माण झालेल्या एका अडथळ्याची त्यांना कल्पना नव्हती. कदाचित एखादी अडचण असली तरी ती दूर करण्याचे काम राजा आणि त्याच्या मंत्रीगणाचे होते. प्रजेने त्यासाठी चिंतित का व्हावे?
गोष्ट अशी होती की, अश्वमेध यज्ञ करणे अयोध्येच्या पराक्रमी राजासाठी सहज होते. अडचण अशी होती की, यज्ञासाठी राजाच्या पत्नीची आवश्यकता होती. पत्नीशिवाय अश्वमेधाचा यज्ञ अग्नी प्रज्वलित होणार नव्हता. राजाचा सारा पराक्रम, सारे मर्यादा पालन, राजकार्यातली सारी चतुरता त्यासाठी कामात येणार नव्हती. पत्नीला राजाने स्वतः निःश्काशित केले होते. राजाने एक पत्नीव्रती रहाण्याची शपथ घेतली होती. अशा अवस्थेत दुसरी पत्नी आणावी कुठून?
कुलगुरूंनी यज्ञाच्या पूर्ततेसाठी राजाला दुसरा विवाह करण्याची आवश्यकता सांगितली. राजाने त्यांना नम्रपणे नकार दिला. त्याचे म्हणणे होते, "ऋषीवर, तुमचे सांगणे मला समजते आहे. माझ्या एका इच्छेनुसार मर्यादा पालनाचे आदर्श प्रजेपुढे ठेवण्यासाठी आपले सुखी गृहस्थ जीवन सोडून पहिली पत्नी वनात गेली. अशी दुसरी कोण सापडणार? माझी गृहस्वामिनी होणे कोणाहीसाठी इतके सहज नाही. दुसरा विवाह माझ्यासाठी शक्य नाही. तुम्ही दुसरा उपाय असेल तर सांगा."
राजाचे म्हणणे ऐकून कुलगुरू विचारात पडले. यज्ञाच्या तयारीसाठी जमलेल्या अनेक ऋषींची सभा भरली. सर्वांच्या चर्चेतून ह्या अडचणीवर एक उपाय सापडला. यज्ञासाठी वनात रहाणाऱ्या अयोध्येच्या महाराणीची एक सुवर्ण प्रतिमा तयार करून यज्ञ करणाऱ्या राजाच्या शेजारी बसवावे. यज्ञ पूर्तीमधे येणारी अडचण दूर झाली.
राजा सहवर्तमान राजप्रसादातील सारे निवासी आणि प्रजाजन यज्ञ स्थान म्हणून निवडलेल्या नैमिष अरण्यात पोहोचले. मुहूर्तावर अग्नी प्रज्वलित झाला. अश्वपूजा झाली. बलाढ्य सैन्यासह राजाचा बंधू अश्व रक्षणासाठी निघाला.
नैमिष अरण्यात राजा आणि त्याचा परिवार धार्मिक कार्य करण्यात व्यस्त झाला. आपल्या मनातली पिडा थोडीशी विसरून तिन्ही राजमाता यज्ञाचा आणि इतर धार्मिक कार्याचा आनंद उपभोगत होत्या. त्यांच्या मुखावरचा शांत भाव पहाताना राजाला त्यांच्या अपराधातून थोडेसे मुक्त झाल्यासारखे वाटत होते.
अयोध्येचा यज्ञ अश्व अनेक राज्ये ओलांडताना मधून मधून होणारी युद्धे जिंकत पुढे चालला होता. इकडे अनेक दिशांचे कलाकार आपापली कला दाखवण्यासाठी नैमिष अरण्याकडे येत होते. अनेक विद्वान ब्राह्मणांचे शास्त्रार्थ चालत असत, वादविवाद चालत असत. भाट, मागध आपल्या मधुर गायनाने यज्ञ मंडपातल्या उपस्थितांचे मनोरंजन करत होते.
अशा प्रकारे अश्व आणि दिवस पुढे सरकत असताना त्या यज्ञमंडपात दोन किशोर अवस्थेतले कुमार राजाच्या चरित्राचे गायन करण्यासाठी आले. मधुर आवाजात चालणारे त्यांचे गायन मंडपातल्या लोकांना मोहीत करत होते. तिन्ही राजमाता ते गायन ऐकताना भूतकाळात गेल्या. राजाच्या चरित्रातले प्रसंग त्यांना नवे नव्हते. गाणारे कुमार नवे असले तरी त्यांना ते ओळखीचे वाटत होते. असे का? हे त्यांना समजत नव्हते. जी कथा राजमातांची होती तीच कथा स्वतः राजाची आणि त्याच्या इतर आप्तजनांची होती. चौकशी अंती कळले की दोन्ही कुमार वाल्मिकी ऋषींचे शिष्य आहेत. राजचरित्राचे गायन करून कुमार आपल्या गुरूंच्या आश्रमात निघून गेले.
राजाने आपल्या गुप्तचरांकडून दोन्ही कुमारांची वार्ता काढायचे ठरवले. दोन्ही कुमार वाल्मिकींचे शिष्य आहेत ह्यापेक्षा अधिक वार्ता गुप्तचरांना कळली नाही. ऋषींचा आपल्या इतर शिष्यांना कुमारांविषयी गुप्तता पाळण्याचा आदेश होता. अर्थात त्यांना तशी फारशी माहिती नव्हती.
अंतरंगातल्या भावनांना अंतरंगात ठेवून राजा यज्ञविषयक इतर कार्यांकडे पाहू लागला. कुमारांच्या वास्तव्याने प्रसन्न झालेल्या राजमाता आपसात कुमारांविषयी वार्तालाप करत असत. त्यांच्या मनात आशेचा अंकुर फुटला होता. ह्या यज्ञामुळे राजाला जे पुण्य मिळेल ते मिळो. त्या तिघींना त्याहीपेक्षा महत्वपूर्ण काही मिळेल असे त्यांना उगीचच वाटत होत.
काही दिवस उलटले. यज्ञअश्व जवळ येत असल्याची वार्ता मिळाली. यज्ञासाठी येणाऱ्या येणाऱ्या अतिथींची संख्या वाढू लागली. अतिथींमधे श्रेष्ठ ऋषी-मुनी होते, राजे-महाराजे होते, विद्वान ब्राह्मण होते. यज्ञ मंडपाच्या आजुबाजूला उभारलेल्या आवासामधे सगळ्यांच्या रहाण्याची सोय होती. राजे लोकांचे आवास एका बाजूला होते. ऋषी-मुनींचे आवास दुसऱ्या बाजूला होते. प्रत्येकासाठी आहार, फळे, कंदमुळे वगैरेंची वेगळी व्यवस्था होती.
अनेक ऋषींमधे वाल्मिकी ऋषींना सुद्धा आदरपूर्वक निमंत्रण होते. राजमातांकडून वाल्मिकींना एक गुप्त संदेश गेला होता. 'दोन्ही गायक कुमारांना त्यांच्या मातेसह आदराने यज्ञासाठी घेवून यावे.' वाल्मिकींनी राजमातांची विनंती मान्य केली होती.
यज्ञाच्या कार्याला गती आली होती. अनेक ऋषी, मुनी आपल्या शिष्यगणांसह यज्ञस्थळी उपस्थित झाले होते. अयोध्येच्या राजाला आणि तिन्ही राजमातांना महर्षी वाल्मिकींची प्रतीक्षा होती. दोघांना आपापल्या परीने गायक कुमारांविषयी उत्सुकता होती.
एक दिवस वाल्मिकी ऋषी यज्ञाला उपस्थित रहाण्यासाठी आले आहेत, अशी राजाला सूचना मिळाली. राजाने विनम्र भावाने त्यांचे स्वागत केले. राजाचे आदरातिथ्य स्वीकारून वाल्मिकी आपल्या आवासात रहाण्यासाठी गेले. दोन दिवसात आपले आणखी काही शिष्य आणि आश्रमवासी तपस्विनी स्त्रिया येणार असल्याचे त्यांनी राजाला सांगितले. राजाने त्यांचे सांगणे ऐकले. जास्त काही विचारणे हे अप्रतिष्ठेचे होईल हे त्याला माहीत होते.
राजमाता यज्ञाला येणाऱ्या अतिथीकडे लक्ष ठेवत होत्या दोन\ चार दिवसात वाल्मिकींच्या आश्रमातील आणखी काही शिष्य आणि साध्वी स्त्रिया ऋषींच्या आवासा जवळच्या बाड्यामधे येवून पोहोचल्या.
अयोध्येच्या राजाने आणि राजमातांनी आपापल्या गुप्तचरांकडून वाल्मिकींच्या आश्रमातल्या साध्वी स्त्रियांची वार्ता काढली. त्यांना कळले की अयोध्येची महाराणी त्या साध्वींच्या मेळाव्यात आहे. दोन्ही गायक कुमार तिचे पुत्र आहेत. अयोध्येचे राजकुमार आहेत. वार्ता अपेक्षित होती. मात्र ती समोर आल्यावर चौघेजण नखशिखांत शहारले. तिघी राजमातांचे शहारण्यात आनंद होता. त्यांच्या पुत्रवधूला बारा वर्षांनंतर त्या पाहू शकणार होत्या. राजाला समजत नव्हते काय विचार करावा? त्याची पत्नी, त्याच्या पुत्रांची माता, आपल्या पुत्रांसह काही पावलांच्या अंतरावर आहे. मनाला खंबीर ठेवावे तरी कसे? दूर होती तेव्हां मर्यादा पालनाचे मनाला बंधन होते. ज्या यज्ञाची ती अधिकारिणी आहे तिथे तिची मूर्ती बसवली आहे. मनाला संयमात ठेवण्याचा प्रयत्न करत अयोध्येचा राजा विचारात हरवला.
अयोध्येची महाराणी आश्रमवासियांत आहे ही गोष्ट राजमातांकडून त्यांच्या इतर पुत्रवधुंना कळली. राजमातांशी झालेल्या चर्चेत ठरले की साऱ्या पुत्रवधू अयोध्येची महाराणी असलेल्या त्यांच्या ज्येष्ठ भगिनीला भेटू शकतात. त्यासाठी त्यांना कोणी अडवू शकणार नव्हते.
राजमातांच्या तिघी पुत्रवधूंनी अयोध्येच्या राजाची भेट घेवून त्याच्याकडे दोन्ही कुमारांच्या मातेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राजाला समजेना एवढ्याशा गोष्टीसाठी ह्या इथे का आल्या आहेत? त्याने तसे बोलून दाखवले. उत्तरा दाखल त्यातली एक म्हणाली, "महाराज, वार्ता तुमच्यापासून लपून नाही. कुमारांची माता आमची ज्येष्ठ भगिनी आहे; जिला महाराजांनी निष्काशित केले आहे. तुमच्या अनुमतीशिवाय आम्ही तिला कसे भेटणार?"
"मी लोकापवादाला दूर ठेवण्यासाठी माझ्या पत्नीला दूर केले होते. तुम्हाला तिला भेटण्यासाठी माझ्या अनुमतीची आवश्यकता नाही. तुम्ही जावू शकता."
राजाच्या अनुमतीने तिघी राजस्नुषा आपल्या ज्येष्ठ भगिनीला भेटल्या. साध्वी वेषातल्या आपल्या भगिनीकडे त्या पहात राहिल्या. सौभाग्य सूचक सिंदूर सोडला तर संपूर्ण सन्यासिनीच्या वेषात आपल्या भगिनीला पाहून तिघीजणी भावनावेगाने तिला लपेटल्या. किती वेळ त्या हुंदके देवून रडत होत्या. मोठ्या मुश्किलीने त्यांच्या ज्येष्ठ भगिनीने त्यांना शांत केले. चौघी भगिनी काही वेळ सुख दुःखाच्या गोष्टी करत बसल्या. शेवटी राजमाता आपली प्रतीक्षा करत असतील. आपल्या ज्येष्ठ पुत्रवधूची वार्ता जाणण्यासाठी उत्सुक असतील ह्या जाणिवेने त्यांनी आपली भेट आवरती घेतली. पुन्हा भेटण्याचे ठरवून तिघी राजस्नुषा राजमातांच्या कक्षाकडे निघून गेल्या.
आपल्या भगिनींच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे अयोध्येची महाराणी शून्य मनाने पहात राहिली. 'राजमातांना माझी चिंता आहे. माझ्या भगिनींना माझी चिंता आहे. मी इथे आले आहे. दोन्ही पुत्र इथे आहेत. हे कळल्यावर आर्यपुत्रांची अवस्था काय झाली असेल? ऋषींच्या सांगण्याचा मान राखून मी इथे आले आहे हे सत्य आहे. ऋषीवर्यांच्या म्हणण्याला होकार देण्यामागे माझ्या मनात एक हेतू आहे. पतीने गर्भवती अवस्थेत मला त्यागले होते. माझ्या बरोबर माझ्या पुत्रांचे भविष्य बांधले गेले होते. दोन्ही कुमार आता बारा वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या पराक्रमी पित्याच्या सानिध्याची आता त्यांना आवश्यकता आहे. माझे आयुष्य मी जगले आहे. ऐश्वर्य पाहिले आहे. मान, सन्मान पाहिला आहे. पतीचे प्रेम अनुभवले आहे. पुत्रांना मोठे होताना पाहिले आहे. आता काय पहायचे राहिले आहे? मुलांना त्यांच्या पित्याच्या हातात सोपवणे एवढेच माझे कार्य राहिले आहे.'
"मी लोकापवादाला दूर ठेवण्यासाठी माझ्या पत्नीला दूर केले होते. तुम्हाला तिला भेटण्यासाठी माझ्या अनुमतीची आवश्यकता नाही. तुम्ही जावू शकता."
राजाच्या अनुमतीने तिघी राजस्नुषा आपल्या ज्येष्ठ भगिनीला भेटल्या. साध्वी वेषातल्या आपल्या भगिनीकडे त्या पहात राहिल्या. सौभाग्य सूचक सिंदूर सोडला तर संपूर्ण सन्यासिनीच्या वेषात आपल्या भगिनीला पाहून तिघीजणी भावनावेगाने तिला लपेटल्या. किती वेळ त्या हुंदके देवून रडत होत्या. मोठ्या मुश्किलीने त्यांच्या ज्येष्ठ भगिनीने त्यांना शांत केले. चौघी भगिनी काही वेळ सुख दुःखाच्या गोष्टी करत बसल्या. शेवटी राजमाता आपली प्रतीक्षा करत असतील. आपल्या ज्येष्ठ पुत्रवधूची वार्ता जाणण्यासाठी उत्सुक असतील ह्या जाणिवेने त्यांनी आपली भेट आवरती घेतली. पुन्हा भेटण्याचे ठरवून तिघी राजस्नुषा राजमातांच्या कक्षाकडे निघून गेल्या.
आपल्या भगिनींच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे अयोध्येची महाराणी शून्य मनाने पहात राहिली. 'राजमातांना माझी चिंता आहे. माझ्या भगिनींना माझी चिंता आहे. मी इथे आले आहे. दोन्ही पुत्र इथे आहेत. हे कळल्यावर आर्यपुत्रांची अवस्था काय झाली असेल? ऋषींच्या सांगण्याचा मान राखून मी इथे आले आहे हे सत्य आहे. ऋषीवर्यांच्या म्हणण्याला होकार देण्यामागे माझ्या मनात एक हेतू आहे. पतीने गर्भवती अवस्थेत मला त्यागले होते. माझ्या बरोबर माझ्या पुत्रांचे भविष्य बांधले गेले होते. दोन्ही कुमार आता बारा वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या पराक्रमी पित्याच्या सानिध्याची आता त्यांना आवश्यकता आहे. माझे आयुष्य मी जगले आहे. ऐश्वर्य पाहिले आहे. मान, सन्मान पाहिला आहे. पतीचे प्रेम अनुभवले आहे. पुत्रांना मोठे होताना पाहिले आहे. आता काय पहायचे राहिले आहे? मुलांना त्यांच्या पित्याच्या हातात सोपवणे एवढेच माझे कार्य राहिले आहे.'
मनाशी काही ठरवून अयोध्येची महाराणी अयोध्येचा राजा पुढे काय करेल याची प्रतीक्षा करू लागली.
अयोध्येचा राजाचे मन आपल्या पत्नीला पहाण्यासाठी उत्सुक होते. त्याहीपेक्षा आपल्या पुत्रांना आलिंगनात घेण्यासाठी उत्सुक होते. मर्यादा पालनाच्या बंधनात अडकलेल्या त्याला ते शक्य नव्हते. आपल्या मनाशी एक विचार ठरवून त्याने मंत्री सुमंतना बोलावणे पाठवले. प्रणाम करणाऱ्या सुमंतांना तो म्हणाला, "आर्य सुमंत, वाल्मिकी ऋषींचा शिष्यवर्ग आणि काही साध्वी स्त्रिया यज्ञासाठी आले आहेत. माझ्या कानावर वार्ता आली आहे की, अयोध्येची महाराणी आपल्या दोन पुत्रांबरोबर त्यामधे आहे. तुम्ही ऋषीवर्यांकडे जावून त्यांना संदेश द्या की, अयोध्येच्या महाराणीने यज्ञाला उपस्थित असलेल्या जन- समुदायासमोर आपली शुद्धता प्रमाणित करण्यासाठी शपथ ग्रहण करावी अशी माझी इच्छा आहे."
No comments:
Post a Comment